narendra modi and nitish kumar
narendra modi and nitish kumar 
देश

'मित्रपक्षांची फसवणूक ठीक नाही'; नवा अध्यक्ष नियुक्त करताच जेडीयूचा बदलला सूर

सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- अरुणाचल प्रदेशमधील जेडीयूच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर जेडीयूने आपले दु:ख व्यक्त केले आहे. जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या  बैठकीनंतर (JDU National Executive meeting) पक्षाचे महासचिव केसी त्यागी यांनी टीका केली. युतीच्या राजकारणासाठी हे योग्य नाही, असं ते म्हणाले आहेत. तसेच लव्ह जिहाद कायदा करण्यासाठी भाजपची सत्ता असलेल्या चढाओढीलाही त्यांनी चुकीचं ठरवलं आहे. 

Mirza Ghalib: अजरामर झालेला शायर मिर्ज़ा गालिब; जाणून घ्या खास 6 गोष्टी

केसी त्यागी म्हणाले की, अरुणाचल प्रदेशच्या घटनेप्रकरणी (Arunachal 6 JDU MLA Join BJP) जनता दल युनायटेडने (जेडीयू) नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने अटल बिहारी यांच्या अटल धर्माचे पालन करायला हवे. जेडीयूने याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत चर्चा केली. जेडीयूच्या आमदारांना अरुणाचलच्या मंत्रिमंडळात सामिल करण्याची चर्चा झाली होती, पण आमदारांना पक्षातच समावेश करुन घेण्यात आला. त्यामुळे जेडीयूमध्ये नाराजी आहे. 

त्यागी म्हणाले की, लव्ह जिहादच्या नावाखाली दोन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हे योग्य नाही. भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये कथित लव्ह जिहादविरोधात कायदे आणण्यात आले आहेत. आता हरियाणासह अन्य राज्यात कायदा आणण्याची तयारी सुरु आहे. 

भाजपला अहंकार नडला; 6 वर्षात 19 मित्रपक्षांनी सोडली साथ!

त्यागी म्हणाले की, विधानसभेच्या निकालानंतर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदापासून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. जनता दल यूनायटेडच्या (JDU) राष्ट्रीय अध्यक्षपदी रामचंद्र प्रसाद सिंह (RCP Singh)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आरसीपी सिंह राज्यसभा खासदार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याचे सर्वांनी समर्थन केले. अध्यक्ष पद सोडून नितीश कुमार यांनी मोठी खेळी खेळली असल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT